कोण आहेस तू...
का मला वेड लावतीस
जी रोज माझ्या स्वप्नात येतीस
तुझे ते इवलेसे, नाजूक डोळे
जण्ू नुकतचे कोशातून
जन्मलेले जीव कोवळे...
तुझे ते मधाळ ओठ
जणु गुलाबाच्या
पाकळ्याचा गंधाचा स्पर्श
तुझे ते गोड हास्य
जणु सारं सुखाचे लपलेले
प्रेमाचे हे रहस्य
तुझे तो प्रेमळ चेहरा
जणू, चंद्राची ही चांदणी
नि जीव हा लाजरा
तुझे ते कुरले केस
जणु पहिल्या पावसाच्या
गंधाचा वास
- स्वप्नील चटगे