उस्मानाबाद : सन २०१२-१३ मध्ये संपूर्ण जिल्हयातील जि.प.प्राथमिक शाळेत
इयत्ता १ ली वर्गासाठी सक्तीचे सेमी इंग्रजी पॅटर्न चालू करण्यात आला. यंदा
दुसरे वर्ष असून सर्व विद्यार्थ्यांन सेमी इंग्रजीचे परिपूर्ण ज्ञान
असलेले व दर्जेदार विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन जि.प. उपाध्या संजय दुधगांवकर यांनी बोलताना केले.
राज्यातील पहिलाच सेमी इंग्रजी पॅटर्न राबविणारी उस्मानाबाद जिल्हा परिषदच्या वतीने जि.प. प्राथमिक शिक्षकासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा जि.प.कन्या प्रशाला, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली. यावेळी दुधगावकर हे बोलत होते.
जिल्हास्तरीय प्राशिक्षण कार्यशाळेसाठी निमंत्रक म्हणून उप शिक्षणाधिकारी (प्रा.) एस.एम. जाधव तसेच विस्तार अधिकारी एम.एस. काळे, एस.बी. वाघमारे, एस.एस. माळी आदींनी मार्गदर्शन केले. जिल्हास्तरीय कार्यशाळेत बोलतांना दुधगांवकर म्हणाले की, ग्रामिण भागातील शाळांमध्ये विद्याथ्र्यांना इंग्रजीचे ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत व्हावे तसेच दर्जेदार शिक्षण मिळावे व ग्रामिण भागातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळाऐवजी जिल्हा परिषदेच्याच शाळेत शिक्षण घ्यावे या उद्देशाने जि.प.ने सक्तीचा सेमी इंग्रजी पॅटर्न सुरु केला आहे.
जिल्हास्तरीय सेमी इंग्रजी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील इयत्ता १ ली साठी ५४ तर इयत्ता २ री साठी ५० तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. या प्रशिक्षित शिक्षकामार्फत तालुकानिहाय कार्यशाळा संपन्न झाल्या. सन २०१३-१४ मध्ये १ ली व २ री साठी सेमी इंग्रजी माध्यमाचे पुस्तके, कृति पुस्तिका राज्य शासनाकडून प्राप्त करुन घेतली. शिक्षकांना १ ली व २ री साठी अध्यापन करतांना चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी जिल्हास्तरावर सेमी इंग्रजीचे प्रशिक्षण आयोजित करण्यांत आले. तसेच तालुका स्तरावरही प्रशिक्षित शिक्षक मार्गदर्शना मार्फत प्रशिक्षण घेण्यांत आले. यावेळी सर्व तालुक्यातील शिक्षकांचे १०० टक्के उपस्थिती होती. यामध्ये तालुकानिहाय प्रशिक्षणार्थी मध्ये १ ली साठी १०६८ तर २ री साठी ९१७ शिक्षकांची प्रशिक्षणासाठी उपस्थिती होती.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यांसाठी राज्यस्तरावरुन प्रशिक्षण प्राप्त करणारे जी. के. सुत्रावे, श्रीमती. गजधने, श्रीमती धाबेकर, गुंजोटे, राऊत, सोनवणे, परीट, सनगुंट्टी आदींनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.