मुंबई -: जादूटोणाविरोधी विधेयक अखेर विधानसभेत आज आवाजी मतदानाने मंजूर झाले. विधानसभेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, सोमवारी हे विधेयक विधान परिषदेत मांडले जाणार आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधेयक याच अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून घेतले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज अखेर आवाजी मतदानाने मंजूर झाले. दरम्यान, भाजप-सेनेचा विरोध कायम आहे. मात्र तो काही प्रमाणात निवळल्याचे दिसत आहे. सरकारने संख्याबळाची मस्ती दाखवली असल्याचे मत भाजपने व्यक्त केले आहे तर, चर्चा न करताच हे विधेयक मंजूर केले असून, वारक-यांच्या मतांचा विचार केला नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर होताच मला आनंद झाला पण त्यासाठी दाभोलकरांचे प्राण गेल्याची खंत आहे, असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले आहे.
जादूटोणा विधेयक हिवाळी अधिवेशनात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी पहिल्याच दिवशी व्हिपही काढला होता. त्यानुसार शुक्रवारी विधानसभेत हे विधेयक सुधारणांनिशी मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे.
दरम्यान, यानंतरही शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते यांनी या विधेयकाला विरोध दर्शिवला आहे. ते म्हणाले, अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर भावनिक वातावरण तयार झाल्याने राज्य सरकार हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालणारे विधेयक आणत आहे. जर हे विधेयक आले तर आघाडीच्या 50 ते 60 आमदारांना मतदार घरी पाठवतील.
विधान परिषदेत विधेयक मंजूर करणार का असा प्रश्न दिवाकर रावते यांना विचारला असता, ते म्हणाले, त्यांचे संख्याबळ जास्त असल्याने विधेयक मंजूर होईल, परंतु आम्ही आमचा विरोध तीव्रपणे मांडणार आहोत. त्यामुळे सहजासहजी विधेयक आम्ही मंजूर होऊ देणार नाही. राज्यातील दहा कोटी जनतेच्या जीवनाशी निगडित हे विधेयक असल्याने परिपूर्ण असे विधेयक सरकारने सादर केले पाहिजे असे आमचे म्हणणे आहे. दाभोलकरांबद्दल आम्हाला तीव्र आदर आहे. मी स्वत: त्यांच्याशी अनेक वेळा बोललो आहे. परंतु त्यांना हिंदूंच्या प्रत्येक प्रथेवर आक्षेप होता. पिंडदान हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु आमच्या रोजच्या जीवनावर जर एखादा कायदा बाधक ठरत असेल तर त्याचा विरोध करायलाच हवा असेही ते म्हणाले.