उस्मानाबाद :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबादच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उस्मानाबादेत दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालन प्रशिक्षण येत्या २६ डिसेंबर ते ५ जानेवारी, २०१४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणात दुग्ध व्यवसायाचे महत्व, गायीच्या जाती, चा-याचे नियोजन, लसीकरण, दुधाचे पॅकिंग, दुध विक्री तसेच शेळी पालन, उस्मानाबादी शेळीचे महत्व, करड्यची निगा, लसीकरण,आहार व आजाराविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच अर्धबंदिस्त व बंदिस्त शेड, शेळयांच्या वेगवेगळया जाती व कुक्कुट पालनात गावरान व बॉयलर आदिची माहिती दररोज १२ ते सायंकाळी ५ यावेळेत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
याशिवाय संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, कर्जाची, अहिल्यादेवी होळकर महामंडळ, नाबार्ड आदि विषयी माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक युवक-युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक दत्तात्रय जावळे मो. ९९२१५२७१३० संपर्क साधावा. किंवा महाराष्ट्र उद्येाजकता विकास केंद्र व्दारा, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन पांडुरंग कांबळे, कनिष्ठ प्रकल्प अधिकारी एम. सी. इ. डी, उस्मानाबाद यांनी केले आहे.