उस्मानाबाद :- राज्य परिवहन महामंडळ, उस्मानाबादच्या मार्ग तपासणी पथकाव्दारे विना तिकिट प्रवास करणा-या १८ प्रवाशांकडून प्रवास भाडयापोटी १ हजार ८३२  व दंडापोटी १ हजार २१४ रुपये दंडाची वसूली केली आहे.
      विभाग नियंत्रक, नवनीत भानप, विभागीय वाहतूक अधिकारी एस. एम. ए. हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत पाटील, ए. सी .गायकवाड,आर. आर. जगताप, पी. एम. पाटील  या तपासणी प्रमुखांनी नोव्हेंबरमध्ये प्रवास भाड्यापोटी वरील रक्कम वसूल केली असल्याची माहिती विभाग नियंत्रक, राज्य  परिवहन महामंडळ, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.                                      
 
Top