उस्मानाबाद :- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तरीय ( NTS) इयत्ता १० वी व राष्ट्रीय आर्थिकदृटया दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS), इ. ८ वी साठी परीक्षा १७ नोव्हेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आल्या होत्या. या दोन्ही परीक्षांच्या संभाव्य उत्तरसूची परिषदेच्या (mscepine.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती व्ही. के. खांडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.
इच्छुक पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी या उत्तरसूचीबाबतचा आपला अभिप्राय/ सूचना /आक्षेप असतील त्यांनी या परिषदेस १९ डिसेंबरपर्यंत पेाहोचतील अशा रितीने आयुक्त, महाराष्ट्रर राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ.आंबेडकर मार्ग, पुणे १ पत्यावर ईमेल mscepune@gmail.com पाठवावेत. वेळेत प्राप्त झालेल्या आक्षेपावर तज्ञांच्या समितीमध्ये चर्चा करुन अंतिम उत्तरसूची तयार करण्यात येईल. ती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल, असे, शिवाजी पांढरे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे-४१११००१ यानी कळविले आहे.