कळंब (बालाजी जाधव) -: येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आजीवन शिक्षण आणि विस्‍तार विभाग यांच्‍यावतीने विद्यार्थी समुप्रदेशन व व्‍यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते.
     या शिबीराचे उदघाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्‍या आजीवन शिक्षण आणि विस्‍तार विभागाचे संचालक डॉ. किसन धाबे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकात जाधवर हे हेाते तर संस्‍थेचे अध्‍यक्ष शिवाजी कापसे, सचिव रंजनाबाई जाधव, सहसचिव प्रा. संजय घुले, संचलाक शाम खबाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाच प्रास्‍ताविक आजीवन शिक्षण व विस्‍तार विभागाचे प्रमुख प्रा. अनंत नरवडे यांनी तर सुत्रसंचालन डॉ. हनुमंत माने यांनी केले. तर आभार प्रा. अनिल जगताप यांनी मानले. र्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्‍यापक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top