कळंब (बालाजी जाधव) :- कळंब तहसिल कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेवरती असलेली निवड समिती रद्द करावी, अशी मागणी कळंब तालुक्‍यातील मस्‍सा (खं.) येथील जनार्धन रामचंद्र राऊत यांनी निवेदनाद्वारे उस्‍मानाबाद जिल्‍हाधिका-यांकडे केली आहे.
    निवेदनात म्‍हटले आहे की, कळंब तहसिल कार्यालयात संगायो व श्रावणबाळ निराधार योजनेत योग्‍य लाभार्थ्‍यांची निवड न करता धनदांडग्‍याची व पुढा-यांची कामे वशिलाने केली जात असून योग्‍य लाभार्थ्‍यांची निवड केली जात नाही. तरी याप्रकरणी संबंधित अधिका-यांवरती योग्‍य ती कार्यवाही करावी, तसेच गाव स्‍तरावरुन पंचनामा करुन योग्‍य लाभार्थी यांची निवड करावी, तसेच सदरील समित्‍या रद्द करण्‍याची मागणी जनार्धन राऊत यांनी केली आहे.
 
Top