कळंब (बालाजी जाधव) : येरमाळा (ता. कळंब) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडे विटभट्टीकरीता कर्ज देण्याची शिफारस उस्मानाबाद जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत करुनदेखील गेल्या पाच महिन्यांपासून कर्ज देत नसल्याचे बाभळगाव येथील शरद वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून अगोदर पन्नास हजार रुपयेचे कर्ज आपण व्यवस्थित परतफेड मुदतीच्या आत केली असताना सुध्दा बँक पुढील कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे, तरी जिल्हाधिकारी यांनी बँकेला कर्ज देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे.