सोलापूर :- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत एकलव्य रेसीडेन्सीयल इंग्रजी माध्यमाच्या शाळा सन 2000 -01 पासुन सुरु असुन सदर शाळेत अनुसुचित जमातीच्या मुला - मुलींना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात सन 2013-14 मध्ये इ. 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विविध शासकीय / अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद व इतर मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळातील अनुसुचित जमातीच्या मुलां - मुलीतुन 30 मुले 0 30 मुलांना इ. 6 वी च्या वर्गात इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसीडेन्सीयल स्कुल कांबळगाव ता. पालघर जि.ठाणे येथे प्रवेश द्यावयाचा आहे. सदर परिक्षेसाठी अर्ज सादर करणा-या विद्यशर्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 1,08,000/- इतकी असावी. सदर शाळेमध्ये प्रवेश घेणा-या मुला - मुलींना निवास, भोजन, क्रमिक पुस्तके, स्टेशनरी, शालेय गणवेश व इतर अनुषंगिक बाबी आदिवासी विकास विभागामार्फत मोफत पुरविण्यात येणार असुन शाळांची संपुर्ण फी देखील शासन भरणार आहे.
सदर प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक आश्रमशाळेवर प्राप्त अर्जानुसार पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व स्पर्धा परिक्षा घेण्यात येईल. तरी इच्छुक पालकांनी सदर परिक्षेसाठी सध्या शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत दिनांक 15 जानेवारी 2014 पर्यंत सादर करावा.
अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उत्तर तहसिल कार्यालय इमारत, सोलापूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. संपर्कासाठी दुरध्वनी क्र. 0217-2311600 असे आवाहन प्रकल्प अधिकारी संदीप गोलाईत यांनी केले आहे.