उस्मानाबाद -: विद्यासन्मतीदास सेवा संस्थेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा समाजरत्न पुरस्कार यंदा जयसिंगपूर येथील अनिल बागणे यांना तर सेवारत्न पुरस्कार नातेपुते येथील इंद्रजित गांधी यांना प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्काराचे वितरण श्री कुलभूषण देशभूषण दिगंबर जैन ब्रम्हचार्याश्रमाच्या शताब्दी महोत्सव व महामस्तकाभिषेकाच्या समारोप प्रसंगी करण्यात आले.
प.पू. 108 चंद्रप्रुभसारगजी महाराज यांच्या प्रेरणेने व आशिर्वादाने विद्यासन्मतीदास सेवा संस्थेची स्थापना समाजातील काही युवकांनी 2012 साली मौजे डिग्रस (जि. सांगली) येथे केली. या संस्थेच्या माध्यमातून जैन समाजातील होतकरु, गोरगरीब, आर्थिक दुर्लब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे काम केले जात आहे. विद्यासन्मतीदास सेवा संस्थेच्यावतीने गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. या संस्थेच्यावतीने 35 मुले दत्तक घेण्यात आली आहे. यात एमपीएससी, यूपीएससी, बीई, एमई, एमसीए, एबीए, बीएड व डीएड होण्याची पात्रता असणारे विद्यार्थी आहेत. ही संस्था समाजातील लहानापासून मोठ्यापर्यंत दानी लोकांच्या दातृत्वावर चालत आहे.
श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र कुंथलगिरी संचलित श्री देशभूषण कुलभूषण दिगंबर जैन ब्रम्हचार्याश्रमाच्या शताब्दी महोत्सव व महामस्तकाभिषेकाचे औचित्य साधून विद्यासन्मतीदास सेवा संस्थेच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प.पू. 108 चंद्रप्रभुसागरजी महाराज व प.पू. 108 सुधर्मसागरजी महाराज, संस्थेचे सचिव वालचंद संघवी, उपाध्यक्ष सुभाष गांधी, संतोष शहा यांची उपस्थिती होती. जयसिंगपूर येथील अनिल बागणे यांना समाजरत्न तर नातेपुते येथील इंद्रजित गांधी यांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्राचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रणजित दुरुगकर यांनी केले. यावेळी डॉ. संदेश गांधी, चकोर शहा, अमित गांधी, सुरेश चौघुले यासह जैन समाजातील श्रावक-श्राविका उपस्थित होते.