उस्मानाबाद :- राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जानेवारी 2014 ते मार्च 2014  या कालावधीत संपणा-या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    यानुसार मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनिवडणक 1 अन्वये नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक -3 ते 7 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनिवडणक 1 अन्वये चा खंड ब नुसार नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ - दि.9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून
          मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनिवडणक 1 अन्वये  चा खंड क नुसार नामनिेद्रशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनाक व वेळ- 11 डिसेंबर सकाळी 11  ते दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक-  11  डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेनंतर.
       मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनिवडणक 1  चा खंड ड नुसार नामनिेद्रशनपत्रे आवश्यक मतदानाचा दिनांक- 22 डिसेंबर सकाळी 7-30 ते सायं 5-30 वाजेपर्यत.
    मतमोजणीचा दिनांक, ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यनेते तहसीलदार निश्चित करतील. त्यानुसार राहील.- दि.23 डिसेंबर.  मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 37 नुसार ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनाक 26 डिसेंबर 2013 असल्याचे कळविण्यात आले आहे.   
 
Top