सोलापूर : देशाच्या रक्षणासाठी कुटुंबापासून दुर सीमेवर सैनिक कार्यरत असतात, त्यांच्या कुटुंबियांची, पाल्यांची शासकीय कार्यालयीन कामे प्राधान्याने केली पाहिजेत असे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2013 या संकलनाचा शुभारंभ व पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, सहायक जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, ले. कर्नल मोहन भालसिंग, पोलीस उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक तुषार दोषी, श्रीमती सीमा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. गेडाम म्हणाले की, जे सैनिक आपल्या कुटुंबियांपासून दुर प्रतिकुल वातावरणात शत्रुसोबत झुंज देत असतात त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे. माजी सैनिकांसाठी शासकीय सेवेत आरक्षण, वसतीगृहे, विविध योजना राबविल्या जात असल्याचे सांगितले.
ध्वजदिन निधीचे ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच ज्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही त्यांनी चालु वर्षी उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन केले.
प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनिल गोडबोले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविकात जिल्ह्यात मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्हाधिकारी व विविध विभागाच्या अधिका-यांनी ध्वजदिन निधी संकलनात हातभार लावला. जिल्ह्यात 95 लाख 40 हजार निधी संकलन करुन 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आभार मानले. हा निधी माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांसाठीच्या विविध योजनांसाठी महत्वपुर्ण असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी सैनिकांसाठीच्या विविध योजनांचे धनादेश व ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिका-यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.