पांगरी (गणेश गोडसे) -: पवनउर्जा प्रकल्पासंदर्भात सविस्तर वृत्तमालिका प्रसिध्‍द होताच व त्याच्या दुष्परिणामांची समज येताच बालाघाट पर्वतरांगा परिसरात आंदोलनाची ठिणगी पडु लागली असुन पांगरी (ता. बार्शी) परिसरातील अनेक गावातील ग्रामपंचायतींनी व ग्रामस्थांनी ठराव करून पवनउर्जा प्रकल्पाचे येणारे संकट टाळण्‍यासाठी कंबर कसण्‍याचा निर्णय घेतला आहे. वेळप्रसंगी या कृत्रीम व मानवनिर्मित संकटांविरूदध विरोध करण्‍यासाठी तीव्र आंदोलन करण्‍याचा विडा उचलला जाईल असे अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच व रइतर पदाधिका-यांनी बोलताना सांगितले.
    नुकतेच 150 किलो मीटर अंतरावर विस्तारत असलेल्या पवन उर्जा प्रकल्पाच्या संदर्भात प्रकल्पाचे फायदे व त्याचे जनमानसावर शेतीव्यवसायावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर व सडेतोड भाषेत विवेचन केले होते. सांगोला, सातारा, कराड, आदी भागात यापुर्वी पवनउर्जा प्रकल्पाच्या आगमनामुळे त्या भागातील शेतक-यांच्या जिवनाच्या विस्कटलेल्या घडीचे सोदाहरण स्‍पष्‍टीकरण दिले होते. पवनउर्जा प्रकल्पांमुळे त्या भागातील पावसाचे प्रमाण प्रतिवर्षी कसे कमी होत गेले व हे प्रकल्प शेतक-यांच्या जिवावर कसे बेतले याची संपुर्ण जानिव वृत्तमालिकेदवारे समाजासमोर मांडली होती. वृत्तमालिकेच्या प्रभावामुळे पवनउर्जा प्रकल्पाची कहानी अणेकांपर्यत पोचुन त्यातुन मोठी जागृती होऊ लागली आहे.बहुतांश लोकांनी होऊ घातलेल्या या पवनउर्जा प्रकल्पांना कोणत्याही स्थरावर जाऊन विरोध करण्‍याचा मानस बोलुन दाखवला आहे.
   बालाघाट पर्वतरांगावर पवनउर्जा प्रकल्पांचे संच उभे राहिल्यास अगोदरच अत्यल्प पर्जन्‍यमानाचा भाग असलेल्या व जगण्‍यासाठी शेतीचा आधार घेऊन धडपड करणारा या पटयातील शेतकरी पुरता कंगाल होणार असुन त्याच्यावर उपासमारीची वेळ येण्‍याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातुनच स्थलांतर, आत्महत्या, बेरोजगारी, व्यासनाधीनता, चो-या आदी अनेक भिषण व भयावह प्रश्‍न सामोरे येणार आहेत. त्याला सामोरे जाताना शासन प्रशासनाला नाकि नऊ येणार आहे. पवनउर्जा प्रकल्पाचे डोक्यावर बसु लागलेले भुत वेळीच रोखने गरजेचे असल्याची उमग झाल्यामुळे या भागातील शेतकरी व जनता जागृत झाली असुन प्रकल्पाचे या भागात आगमन झाल्यास आंदोलनाची ठिणगी पडुन आंदोलन चिघळण्‍याची व स्फोटक बनण्‍याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    संघटनाही सरसावल्या
    पांगरी भागातील बालाघाट डोंगरांगावर पवनउर्जा प्रकल्पांचे काम सुरू केल्यास त्याला तीव्र विरोध करण्‍यासाठी अनेक स्थानिक संघटनांनीही कंबर कसण्‍याची तयारी दर्शवली आहे. शेतक-यांच्या माथ्यावर मारण्‍यासाठी येत असलेले संकट पिटाळुन लावण्‍यासाठी संघटनामार्फत संघटीतपणे लढा दिला जाईल असे संघटनातर्फे बोलले जात आहे. एवढया घडामोडी घडत असल्या तरी राजकीय दृष्टया अति संवेदनशिल समजल्या जाणा-या या विभागातील एकाही राजकीय पदाधिका-याने याविरोधात ठोस भुमिका घेऊन पवनउर्जा प्रकल्पाला विरोध करण्‍याचे धाडस दाखवले नसल्याबददल शेतक-यामधुन आश्‍चर्य व्यक्त केले जात असुन होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत याचा जाब विचारण्‍याचा निर्धार मात्र शेतक-यांनी केला आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत या भागातील पवनउर्जा प्रकल्पाच्या आगमनाचा मुद्दा हा कळीचा ठरू शकतो असे कांही जानकारांचे म्हणने आहे. या भागातील जनतेच्या मनात या प्रकल्पाविषयी असंतोष धगधगत असुन त्याचे प्रत्यंतर कशात होईल हे येणारा काळच सांगेल.
  शाश्‍वत उर्जा स्त्रोत्राचा उपयोग करून घेऊन त्यातुन दैनंदीन गरजा भागवण्‍यासाठी उपयोग करून घेण्‍याचा मुद्दा जरी खरा असला तरी पवनउर्जा प्रकल्पांची निर्मिती करताना त्या भागाची रचना परिस्थती व पर्जन्यमान याचा सारासार विचार करूनच या प्रकल्पांची स्थापना करणे गरजेचे असताना या भागात फक्त प्रकल्पांच्याच सोयीचा विचार करूण येथील पर्जन्यमानाच्या मुदयाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केल्याचा या भागातील शेतक-यांचा आक्षेप आहे. मुळातच या पटयात पाऊस कमी पडतो. जो पाऊस पडतो तोही साठवण तलाव या भागात नसल्यामुळे पडलेले पाणी वाहुन जाते. या भागातील शेतक-यांना शेतीसाठी व जनतेच्या पिण्‍याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली काढुन खुशाल पवनउर्जा प्रकल्प उभारून पैसै कमवा अशी या भागातील जनतेची मागणी आहे.
 
Top