कळंब (बालाजी जाधव) :- बरमाचीवाडी (ता. कळंब) या गावाची कोरडवाहू शेती अभियांनातर्गत निव्‍ाड करण्‍यात आली असून येथील शेतक-यांना ज्‍वारीचे बियाणे वाटप करण्‍यात आले होते. पंरतु सदरचे पेरणी केलेले बियाणांच्‍या झाडांची उंची दोन फुटापेक्षा जास्‍त नसून सदर झाडांच्‍या फुटव्‍याचा पोटरे बाहेर पडत आहेत. सदर शेतक-यांच्‍या पेरणी केलेल्‍या शेतावर अधिका-यांमार्फत योग्‍य ती पाहणी करुन पंचनामा करुन झालेल्‍या नुकसान भरपाई तात्‍काळ देण्‍याची मागणी बरमाचीवाडी येथील शेतक-यांनी निवेदनाद्वारे कळंब पंचायत समितीच्‍या गटविकास अधिकारी यांच्‍याकडे केली आहे.
    निवेदनात म्‍हटले आहे की, कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कळंब तालुक्‍यातील बरमाचीवाडी गावाची निवड करण्‍यात आली व त्‍या निवडीनुसार येथील शेतक-यांना कृषी सहाय्यक, कृषी कार्यालय कळंब यांच्‍या मार्फत ज्‍वारी महाबीज महामंडळाचे ज्‍वारीचे बियाणे प्रत्‍येकी एक बॅग बियाणेप्रमाणे वाटप करण्‍यात आले होते. त्‍या प्रत्‍येक बॅगची प्रत्‍येक खातेदार शेतक-यांकडून दोनशे रुपयेप्रमाणे लोकवाटा स्‍वरुपात घेतलेले आहे. सदरचे बियाणे शेतक-यांनी पेरणी केलेली असून बियाणेची उगवण झालेली आहे. मात्र सदर बियाणांच्‍या उगवणीनंतर प्रत्‍येक ताटाचा कोम जळून प्रत्‍येक ताटाला फुटवडा लागलेला आहे. पेरणी केलेल्‍या बियाणांच्‍या झाडांची उंची दोन फुटापेक्षा जास्‍त नसून सदर झाडांच्‍या फुटव्‍याचा पोटरे बाहेर पडत आहेत. सदर बियाण्‍यांची पेरणी कृषी सहाय्यक कळंब यांच्‍या सांगण्‍याप्रमाणे केलेली आहे. तरी सदरील खातेदार शेतक-यांच्‍या पेरणी केलेल्‍या शेतावर कृषी अधिका-यांमार्फत योग्‍य ती पाहणी करुन त्‍याचा पंचनामा करुन खातेदार शेतक-यांना झालेली नुकसानभरपाई तात्‍काळ द्यावी अन्‍यथा कोर्टात दाद मागण्‍यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्‍यात आले. या निवेदनावर किरण बोराडे, लक्ष्‍मण तिबोले, सुर्यकांत बोराडे, शंकर बोराडे, जयराम पाटील, बाबुराव मुठाळ, सोपान बोराडे, शरद महाजन, बिभिषण कानडे, महादेव महाजन, उमेश पाटील यांच्‍या 22 शेतक-यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. या निवेदनाची एक प्रत माहितीस्‍तव उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी, कळंब तहसिलदार, जिल्‍हा कृषी अधिक्षक उस्‍मानाबाद, तालुका कृषी अधिकारी कळंब, मंडळ कृषी अधिकारी येरमाळा, ग्रामसेवक बारमाचीवाडी,     तलाठी वाघोली ता. कळंब आदींना देण्‍यात आले आहे.
 
Top