कळंब (बालाजी जाधव) : येथील वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ. रामकृष्ण लोंढे यांना इंडियन मेडीकल असोसिएशनचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
        कळंब येथे डॉ. रामकृष्ण लोंढे गेली तीस वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत असून येथील आय. एम. ए. चे अध्यक्ष असुन आय. एम. ए. च्या राज्य स्तरीय कार्यकारी मंडळावर कार्यरत आहेत. वेळोवेळी रूग्णांसाठी आरोग्य शिबीरे, डॉक्टरसाठी व्याख्याने, कार्यशाळा, सि. एम. ई. इ. घेऊन वैद्यकिय क्षेत्रातील अद्यावत ज्ञान पुरवण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर-रूग्ण संबंध सलोख्याचे ठेवण्यासाठी तसेच डॉक्टरांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे प्रयत्न केले जातात. अखिल भारतीय बालरोग परिषद (आय. ए. पी.) उस्मानाबाद शाखेचे ते अध्यक्ष असुन बालकांच्या आरोग्याविषयी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे त्यांनी इ. स. २०१४-१५ च्या कळंब रोटरीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे.
       त्यांच्या कार्याची दखल घेऊन आय. एम. ए. च्या महाराष्ट्र शाखेतर्फे अहमदनगर येथे भरलेल्या ५३ व्या वार्षिक परिषदेमध्ये त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव (नागपूर), डॉ. मिलींद नाईक, डॉ. अनिल पाचनेरकर (मुंबई), डॉ. दिलीप सारडा (पुणे) यांच्या उपस्थितीत प्रेसिडेंट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
       हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. लक्ष्मण जाधवर, डॉ. डिकले, डॉ. मुंदडा, डॉ. सत्यप्रेम वारे, डॉ. दिनकर मुळे, डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. शेळके मॅडम, डॉ. नितिश गावडे, डॉ. कस्तुरकर, डॉ. पुरुषोत्तम पाटील, रोटरी अध्यक्ष अ‍ॅड. दत्ता पवार, संजय देवडा, संजय घुले, शिषीर राजमाने, सतिश मांडवकर, डॉ. सुनिल थळकरी, जगदिश जाजू, विक्रम गायकवाड, बी. बी. ठोंबरे, विश्वजित ठोंबरे आदिंनी अभिनंदन केले.
 
Top