उस्‍मानाबाद -: आंबेवाडी (ता. उस्‍मानाबाद) येथे ग्रामस्‍थांच्‍यावतीने अखंड हरिनाम सप्‍ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले असून हे सप्‍ताह आयोजनाचे 39 वे वर्ष आहे.
    या सप्‍ताहाची सुरुवात गुरुवार दि. 2 जानेवारी पासून होत असून यामध्‍ये विविध कार्यक्रमासह किर्तनाचेही आयोजन करण्‍यात आले आहे. गुरुवार रोजी नवनाथ महाराज चिखलीकर, शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी अनिल महाराज बाभळगावकर, दि. 4 रोजी संदीपान महाराज हसेगांवकर, दि. 5 रोजी भांगे महाराज लातूरकर, दि. 6 रोजी बाबा महाराज बोराडे काडगावकर, दि. 7 रोजी झोळ महाराज आळंदीकर, दि. 8 रोजी भंडगे महाराज सोलापूरकर, दि. 9 रोजी समाप्‍ती असून हरिदास महाराज शिंदे सोलापूरकर यांचे काल्‍याचे किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. त्‍याचबरोबर रविवार दि. 5 जानेवारी रोजी रांगोळी स्‍पर्धा व वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. तर दि. 6 रोजी महिला भजनी मंडळाचे भजन, दि. 9 रोजी शह‍ीदांना ग्रामस्‍थातर्फे श्रध्‍दांजली वाहण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाचा आंबेवाडी व परिसरातील भाविकांनी लाभ घेण्‍याचे आवाहन आंबेवाडी ग्रामस्‍थांनी केले आहे.
 
Top