बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी, माढा, करमाळा या तीन विभागातील महाविरतणची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने वीज जोडणी बंद करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यातील २३ हजार ५७६ थकबाकीदार ग्राहक असून त्यांच्याकडून ८१ कोटी १३ लाख रुपये थकबाकी येणे आहे. करमाळा तालुक्यातील ३० हजार ९३ ग्राहक थकबाकीत असून त्यांच्याकडील ८५ कोटी ५२ लाख रुपये येणे बाकी आहे. माढा तालुक्यातील ३९ हजार १०२ ग्राहक थकबाकीत असून त्यांच्याकडील ११४ कोटी १७ लाख येणे आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील बार्शी तालुक्यातील १७४ ग्राहक व त्यांच्याकडील २ कोटी ४४ लाखांचे येणे थकीत आहे. करमाळा तालुक्यातील पा.पु. १३३ ग्राहकांची १ कोटी २३ लाख थकीत आहे. माढा तालुक्यातील पा.पु. १२६ ग्राहकांची १ कोटी ५ लाख थकीत आहे. बार्शी शहरातील औद्योगिक क्षेत्रातील विज पुरवठ्याची बीले वेळेवर मिळत आहेत. सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या उजनी प्रकल्पावरील बीले मागील अनेक वर्षांपासून वेळेत मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात विज बीले थकीत बाकी वाढ होण्याचे प्रमाण असल्याने येत्या काळात वीज पुरवठा खंडीत करणे भाग पडत असून वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येत असल्याचेही नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकार्यांनी सांगितले.