नजर माझी शोधते फक्त तुला,
कोठे शोधतेस तु मला,
एका क्षणी तु मला दिसलीस,
आणि मनाची घालमेल
संथ पाण्याप्रमाणे वाहु लागली,
काय माहित ती नजर,
तुलाच शोधत राहली,
जीव हा वेडा तुझ्या श्वासात ,
ह्दयी भास होई,
तुझ्या स्पंदनाचा,
अंतःरंगात प्रेमाचा,
भास हा नवासा....!!
- स्वप्नील चटगे