![]() |
| जीवनदत्त आरगडे |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मुळचे बार्शी तालुक्यातील असलेल्या जीवनदत्त आरगडे यांची कॉंग्रेसच्या आरोग्य सेल राज्य प्रवक्तापदी निवड झाल्याचे पत्र अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी दिले आहे.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिफारस केल्याने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी देशमुख यांना सूचना केली, त्यानुसार आरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीकरीता सरचिटणीस यशवंतराव हाप्पे, चिटणीस संदिप चौपाने, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रा.अनिल आबुटे, अॅड. सुभाष जाधवर, महावीर कदम, दादासाहेब गायकवाड, आण्णा शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे आरगडे यांनी सांगीतले.