बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- शिक्षक चळवळीचे प्रणेते कै.तात्या सुळे यांच्या स्मरणार्थ शिक्षकांसाठी राज्यस्तरीय शैक्षणिक लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह एस.डी. जमाले यांनी दिली.
शासन मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील तसेच सेवानिवृत्त शिक्षकांसाठी या स्पर्धा आयोजित केल्या असून स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. शब्दांची कमाल मर्यादा पंधराशे शब्द आहे. अनुक्रमे २ हजार १ हजार ५००, १ हजार अशी बक्षीसे देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी लेखाचे विषय १) शिक्षक संघटनामधील राजकारण्यांचा हस्तक्षेप तारक कि मारक, २) आजची शिक्षण पध्दती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक आहे काय?, ३) शिक्षकांचा कार्यभार शिक्षकाच्या भारंभार, ४) आजच्या विज्ञानयुगातील अंधश्रध्दा, असे विषय आहेत. स्पर्धेत सहभाग घेणार्यांनी ज्ञानेश्वर कानडे, स्नेह हौसिंग सोसायटी, फिलिया हॉस्पिटल समोर, पालघर जि.ठाणे या पत्त्यावर दि.१० जानेवारी पर्यंत आपले लेख पाठवणे गरेजेचे आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मुकूंद साळुंखे, सचिन झाडबुके, अंबादास मस्के, राजाराम शिवशरण, रमेश पवार, महादेव कमळे यांनी केले आहे.