सोलापूर :- सन 2013-14 या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त झालेले निवृत्ती वेतन/ कुटुंब निवृत्ती वेतन आयकर पात्र होत असेल तर सर्व निवृत्ती वेतनधारकांनी आपला पॅन नंबर व बचतबाबतची माहिती जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर या कार्यालयात दिनांक 10 जानेवारी 2014 पर्यंत सादर करावी. पॅन कार्ड सादर न केल्यास व आयकर पात्र असल्यास भारत सरकार वित्त मंत्रालय, महसुल विभाग यांनी दिनांक 20 जानेवारी 2010 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार माहे जानेवारी 2014 च्या निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्ती वेतनातून त्यांचा आयकर 20 टक्के दराने परस्पर कपात केला जाईल व कपात केलेल्या आयकर परताव्याबाबत कार्यालय जबाबदार राहणार नाही.
तसेच त्यांनी निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतनावरील आगाऊ आयकर परस्पर भरणा केला अथवा करणार असल्यास आगाऊ भरणा केलेल्या आयकराबाबतची माहिती वरील तारखेपर्यंत सादर करावी असे आहरण व संवितरण अधिकारी तथा अप्पर कोषागार अधिकारी ए.एस. लोहार यांनी केले आहे.