तुळजापूर : शहरातील भीमनगरमध्ये तिरट नावाचा जुगार खेळणार्या दहा जणांना पोलीसांनी ताब्यात घेऊन रोख ८३०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
संभाजी कदम, दत्ता कदम, अमर कदम, बाळू कदम, मारुती कदम, औदुंबर गवळी, रमेश हुंबे, अविनाश कदम, र्शावण कदम, शिवाजी कदम (सर्व रा. तुळजापूर) असे अटक करण्यात आलेल्या जुगा-यांचे नाव आहेत. शहरातील भीमनगर येथे पैशावर जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून वरील आरोपपींना ताब्यात घेऊन रोख ८३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.