परंडा : मुगाव (ता. परंडा) येथे जिल्हा नियोजन समितीमधुन मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण व खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या खासदार निधीतुन मंजूर झालेल्या सभागृहाचे आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी आ. मोटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
    परंडा तालुक्यातील मुगाव येथे जिल्हा नियोजन समितीमधुन रस्ता डांबरीकरणासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. व याच ठिकाणी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या फंडामधुन ५ लाख रूपये सभागृहासाठी मंजूर झाले आहेत. या दोन्ही कामाचे उद्घाटन आ. मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुगाव येथील शिवसेनेचे ग्रा. पं. सदस्य आबासाहेब उद्धव गवंडी यांनी व सेनेचे कार्यकर्ते बबन लक्ष्मण सुतार यांनी आ. मोटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
    यावेळी कार्यक्रमासाठी दत्ता पाटील, पै. नवनाथ जगताप, पंकज पाटील, भाऊसाहेब खरसडे, दिपकराजे भांडवलकर, अ‍ॅड. सुभाष वेताळ, अनिल झिरपे, मुगावचे राजाभाऊ पाटील, शहाजी पाटील, उत्रेश्वर शिंदे, हनुमंत जगताप, विक्रम जगताप, संतोष जगताप, नाना मांडवे, शिवाजी नलवडे, वाजीद शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top