नळदुर्ग - येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. अर्पणा अरविंद बेडगे यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजीपासून स्विकारले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्यक्ष शब्बीरअली सय्यद सावकार हे रजेवर गेल्याने मंगळवार रोजी न.पा. सभागृहात कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर सुरवसे यांनी सौ. अर्पणा बेडगे यांना प्रभारी नगराध्यक्षपदाची सुत्रे दिली. यावेळी कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रभाकर सुरवसे, संघटनेचे अध्यक्ष डी.एन. कस्तुरे यांनी बेडगे यांचा सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक शहबाज काझी, नितीन कासार, नय्यर जहागिरदार, अमृत पुदाले, कमलाकर चव्हाण, नगरसेविका निर्मला गायकवाड, मुनवर सुलताना कुरेशी, मंगल सुरवसे, सुप्रिया पुराणिक यांच्यासह कर्मचारी, प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.