उमरगा (लक्ष्‍मण पवार) : अकोला जिल्‍हापरिषद निवडणुकीत भारीप बहुजन महासंघाच्‍या हाती सत्‍ता मिळाल्‍याबद्दल उमरगा तालुक्‍यातील भारीपच्‍या कार्यकर्त्‍यांनी सोमवार रोजी सायंकाळी नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याला हार घालून फटाक्‍याची आतिषबाजी केली. तसेच मिठाईचे वाटप करुन आनंदोत्‍सव साजरा केला.
    यावेळी भारीप नेते रामभाऊ गायकवाड, अॅड. हिराजी पांढरे, सुभाष सोनकांबळे, सिराज काझी, अच्‍युत कसबे, पंढरीनाथ कोणे, प्रा. सुभाष राठोड, बाळू माने, सुरेश सरपे, बजरंग सोनकांबळे, संदीप कांबळे, अशोक बनसोडे, महेंद्र गायकवाड आदींची उपस्थिती होती.
 
Top