श्रीदत्‍त जयंती पर्व देव संस्‍कृतीच्‍या अध्‍यात्मिक परंपरेचे एक पावन पर्व आहे. चौवीस गुरुला धारण करणारे श्री दत्‍तात्रय ब्रम्‍हा, विष्‍णू आणि महेश या तिन्‍ही देवांचा अवतार आहे. भगवान दत्‍तात्रयचे शिष्‍य नवनाथ आहे, या नाथसंप्रदाय यांच्‍या माध्‍यमातून ज्ञान, कर्म आणि योग जनमाणसासाठी सरळ, सहज बनविले आहे. सदगुरुच्‍या गुरुतेला समजून, नतमस्‍तक होऊन त्‍याच्‍या प्रती समर्पनाचा भाव आहे, तर त्‍याचवेळी आपल्‍या शिष्‍याच्‍या प्रती प्रामाणिकता, प्रखरता आहे आणि योग्‍यतेला जागृत करण्‍याची एक विशिष्‍ट संधी आहे. भारतीय संस्‍कृतीला जिवंत ठेवणे आणि तिला जगतगुरुच्‍या पदावर आरुढ करणे, यामध्‍ये परंपरेची महत्‍वाची भुमिका राहली आहे.
    गुरु आणि शिष्‍य यांचा संबंध विशुध्‍द रुपामध्‍ये अध्‍यात्मिक आहे. गुरू ज्ञान संपन्‍न, अध्‍यात्मिक संपन्‍न होण्‍यासाठी असतो. गुरु देवापेक्षाही काही अधिक असतो. म्‍हटले गेले आहे की,
गुरु गोविंद होऊ खडे, काके लागु पाय ||
बलीहारी गुरु अपने गोविंद दियो बताये ||
    तुलशीदासाच्‍या शब्‍दामध्‍ये 'रामते अधिक रामकर दासा |' कारण देव तर अत्‍यंत सुक्ष्‍म सत्‍ता आहे. ज्‍याची आम्‍हाला खुप दुरपर्यंत जाणीव होऊ शकते. परंतु गुरु प्रत्‍यक्षातही असतो, जे आम्‍हाला नाही समजत ते त्‍यांना कळत असते. ते अत्‍यंत सौभाग्‍यशाली आहेत, ज्‍यांनी अशा गुरुंचे दर्शन केले आहे. परंतु ते परम सौभाग्‍यशाली आहेत, त्‍यांनी दर्शनासोबतच आपल्‍या चेतनला त्‍यांच्‍या परचेतने सोबतच जोडण्‍याचा सतप्रयास केला आहे. वस्‍तुतः गुरुच्‍या दिव्‍य शक्‍तीला धारण करण्‍याचा अधिकारी फक्‍त शिष्‍यच असतो. प्रश्न उठतो की कोणता शिष्‍य? तोच शिष्‍य जो गुरुच्‍या चरणामध्‍ये आपले संपुर्ण अस्तित्‍व अर्पण करतो. तोच शिष्‍य जो जिवनातील सुख-सुविधांना आणि भौथ्‍तक सुविधांच्‍या माध्‍यमातून क्षणभंगुरतेला समलता आहे आणि जिवनाचा यथार्थ स्‍त्रोत आनंद आणि पुर्णत्‍व स्थितीला समजून तिला मिळविण्‍यासाठी व्‍याकुळ आहे. परंतु अत्‍मअनुसंधानाचा मार्ग खुप कठीण आहे. गुप्‍त संकटाचा आहे, अशा परिस्थितीमध्‍ये गोस्‍वामी तुलशीदासांनी बरोबर म्‍हटले आहे की, ''गुरु विन होही न ज्ञान'' अर्थात् गुरुशिवाय ज्ञान नाही होत. भक्‍तीकाळामध्‍ये प्रगटलेले सदगुरु संत कबीरांनी आपल्‍या शब्‍द वाणीमध्‍ये गुरुच्‍या महीमेचे वर्णन करताना सांगितले आहे की, गुरु फक्‍त गुरु आहे. गुरुची समानता कोणाशीही होऊ शकत नाही. गुरु ज्ञानस्‍वरुप आहे. गुरुपासून दिक्षा घेतलेला जीव आपल्‍या पुरतेचे नव्‍हे तर इतरांसाठी कल्‍याणकारी सिध्‍द होतात.
    संत कबीर सांगतात की, सदगुरुला शरण जाऊन जिज्ञासु व्‍यक्‍ती त्‍यांच्‍यापासून ज्ञान, दिक्षा ग्रहन करतात आणि जेंव्‍हा श्रध्‍दा भावाने सदगुरुच्‍या वचनांचे श्रवण करुन आपल्‍या जिवनात त्‍याचे आचरण करतात. मग त्‍यांचे जिवन पहिल्‍यासारखे राहत नाही आणि त्‍यांच्‍या जिवनात आध्‍यात्मिक क्रांतीचा सुर्योदय होतो. त्‍यामुळे त्‍यांच्‍या सर्व अज्ञानाचा अंधार नष्‍ट होतो. सदगुरुंच्‍या उपदेशाने भक्‍ताच्‍या जिवनात एक नवीन आचार संहिता निर्माण होते. ज्‍यामुळे सत्‍य, दया, क्षमशिल आणि विचार या सदगुणांचा समावेश होतो. सदगुरुंच्‍या दिव्‍य संदेशाने केवळ भक्‍तांचा नव्‍हे तर संपूर्ण समाज आणि राष्‍ट्रांचाही विकास होतो.
    मानवता आपल्‍या जिवनामध्ये गुरुपासून दिक्षा घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. दिक्षेचा मूळ अर्थ आहे की, आपली इच्‍छा त्‍यांना देणे, आपला अहंकार समर्पित करुन स्‍वतःला खाली करुन टाकणे, तेच ख-या अर्थाने गुरुंचे खरे शिष्‍य म्‍हटले जावू शकतात आणि दिव्‍य अनुदानाचे पात्र ही तेच बनु शकतात, वस्‍तुतः गुरुंची भुमिका एका कुंभाराची असते. शिष्‍य हा कच्‍या मातीचा एक गोळा असतो. शिष्‍य जेंव्‍हा आपल्‍या अहंकाराला गुरुंच्‍या चरणी अर्पण करतो, तेंव्‍हा गुरु आपल्‍या भक्‍तीद्वारे त्‍याला ज्ञान प्राप्‍तीचा अधिकारी बनवितो. त्‍याला जिवन लक्ष प्राप्‍तीच्‍या ध्‍येयाकडे प्रवृत्‍त करतो. गुरु जेंव्‍हा मनापासून प्रेम, जिव्‍हाळा आणि आधार देतो, तिथेच बाहेरुन रागावणे, फटकारणे त्‍यांच्‍या पासुन ही वाचत नाही. बाहेरुन गुरुंचा व्‍यवहार कसाही असला तरी त्‍यातुन त्‍याचे ह्दय प्रेमाने भरलेले असते. गुरु हे ज्ञानाची प्रज्‍वलित मशाल आहे. ते स्‍वतः जिवंत शास्‍त्र आहे. त्‍यांची एक नजर आपल्‍या जिवनात उतरवण्‍याचा प्रयत्‍न हे शिष्‍याचे ख-या अर्थाने गुरुवंदन आहे. गुरुचरणाचा गुरुपासून एकात्‍मतेच्‍या अनुभवाचा अर्थ आहे. परमात्‍मापासुन एकात्‍मता गुरु शरीर भर होत नाही, तेच चेतनापुंजी असतात, गुरुपवित्रता शांती, प्रेम आणि ज्ञानाची साक्षात मुर्ती आहे. ते साकार सुध्‍दा आहे आणि निराकार सुध्‍दा आहे. त्‍यांना मिळविण्‍यासाठी आवश्‍यक आहे आपली खरी श्रध्‍दा.
    श्रीदत्‍त जयंती महापर्व आपल्‍या सर्वांसाठी हा संदेश घेऊन आली आहे की, आपले गुरु आपल्‍यापासून दुर नाही. त्‍यांना बोलावणारा त्‍यांच्‍या कृपेपासुन कधीही वंचित राहू श्‍ाकत नाही. नवनाथांचे कर्माचे अनुकरण करुन आपल्‍या जिवनामध्‍ये आत्‍मसात करणे गरजेचे    आहे.
    || जयहिंद, जयधर्म ||

- प.पू. सदगुरु श्री भय्यूजी महाराज
प्रणेता
श्री सदगुरु दत्‍त धार्मिक एवं     पारमार्थिक ट्रस्‍ट,
इंदौर (मध्‍यप्रदेश)

 
Top