उस्‍मानाबाद -:  येणा-या लोकसभा व विधान सभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन हे अटळ असून शिवसेना-रिपाई-भाजपा महायुतीची सत्ता केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात येणार असा आत्‍मविश्वास रिपाइंचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष राजाभाऊ ओव्‍हाळ यांनी व्‍यक्‍त केले.
     येत्‍या 15 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे आयोजित रिपब्लिकन (आठवले) पार्टी ऑफ इंडियाच्या परिवर्तन जिल्हा मेळाव्याच्या पूर्व तयारीकरीता रिपाइं कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्‍यात सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. उस्‍मानाबाद येथे शनिवार रोजी झालेल्‍या बैठकीच्‍या अध्यक्षस्थानी रिपाइंचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ हे होते तर रिपाइंचे प्रदेश सचिव संजय बनसोडे, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आवर पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बनसोडे आदीजण उपस्थित होते.
    दि. 15 जानेवार 2014 रोजी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित रिपाईच्या उस्मानाबाद जिल्हा मेळाव्यात परिवर्तन मेळावा असे नाव देण्यात आले आहे. या मेळाव्यास जिल्हातील 40 ते 50 हजार कार्यकर्ते उपस्थितीत राहणार असून हा मेळावा उस्मानाबाद जिल्हातील राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
      यावेळी रिपाईचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के.गायकवाड, लोहारा तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, युवा अघाडीचे जिल्हाध्यक्ष रणजित मस्के आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मागासवर्गीयांच्या विषयी असलेल्या विविध योजना, रिपाई घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्ष विद्यानंद बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, अरूण लोखंडे, सुनिल थोरात, पोपट लांडगे यांच्‍यासह कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.
 
Top