कळंब (भिकाजी जाधव) :- चोरट्यांनी घराचे कुलुप तोडुन सोने-चांदीच्‍या दागिन्‍यासह रोख रक्‍कम असे मिळून सुमारे 67 हजार 500 रुपये लंपास केल्‍याची घटना कळंब शहरातील मार्केट यार्ड येथे आज सोमवार रोजी उघडकीस आली. 
      कळंब शहरातील मार्केट यार्डमध्‍ये राहणारे विष्‍णू ज्ञानदा मंडाळे हे लग्‍नकार्यासाठी घराला कुलूप लावून गावाला गेले असता त्‍यांच्‍या घराचे कुलुप तोडून सोने-चांदीच्‍या दागिन्‍यासह रोख रक्‍क्‍म 67 हजार 500 रुपये अज्ञात चोरटयांनी लंपास केले. विष्‍णू मंडाळे यांच्‍या फिर्यादीवरुन कळंब पोलिसात अज्ञात चोरटयांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.एन. शेळके हे करीत आहेत. सदर चोरीच्‍या घटनामुळे कळंब तालुक्‍यात खळबळ उडाली असून पोलिसांनी गस्‍त वाढविण्‍याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
 
Top