पांगरी (गणेश गोडसे) : इंडीका व दुचाकी यांची धडक होऊन दुचाकीवरील तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 25 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पांगरी-येरमाळा मार्गावर घडली.
शहाजी धर्मराज माने, दिपाली शहाजी माने व आदित्य शहाजी माने अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील जखमींची नांवे असुन त्यांच्यावर बार्शीतील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी इंडीकाचालकाविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी शहाजी माने यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्याची दुचाकी (क्र. एम.एच.25.झेड 2806) वरून जात असताना समोरून येणा-या इंडीका (क्र. एम.एच.13 एक्स.1060) ने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. अपघातात त्यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. रोडच्या परिस्थतीकडे लक्ष न देता हयगयीने वाहन चालवुन जखमी होण्यास कारणीभुत ठरल्याप्रकरणी सतिश काळे यांच्याविरूदध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत.