महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारितील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (23 जागा), वैज्ञानिक सहायक-मानसशास्त्र (2 जागा), वैज्ञानिक सहायक-सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण (5 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (8 जागा), वरिष्ठ लिपिक -भांडार (1 जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (7 जागा), लिपिक टंकलेखक (11 जागा), वाहनचालक (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (16 जागा), चपराशी (3 जागा), सहआचारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती www.formonline.net/fsl व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.