उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम, सर्वश्री दत्तात्रय गायकवाड, डॉ. मुमताज सय्यद, सुरजिसिंग खुंगर सदस्यांचे पथक दोन दिवस जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
         बुधवार, दि.29 जानेवारी रोजी सायंकाळी बीडहून उस्मानाबादकडे प्रयाण करतील. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.
     गुरुवार, दि. 30 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीची भेट,  राखीव. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य  कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, नगरपालिका प्रशासन व इतर संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक. अल्पसंख्याक योजनांचा आढावा घेतील. दु. 4 वा. पत्रकार परिषद. सायंकाळी 5 वाजता उस्मानाबादहून लातूरकडे प्रयाण करतील.  
 
Top