उस्मानाबाद :- दैनंदिन गरजेकरीता वनांवर अवलंबून राहवे लागते. लोकांच्या सहभागामुळे वनसंरक्षण व व्यवस्थापन करणे, वनावरील ताण कमी करणे, वनांची नैसर्गिक पुनर्मिर्मीती होण्यासाठी प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या आवारात हरित महाराष्ट्र अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आला.
       याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, विभागीय वन  अधिकारी बी एन कदम आणि अप्पासाहेब पाटील आदिंच्या हस्ते वृक्षारोपण करुन या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
       या कार्यक्रमाचे आयोजन वन परिक्षेत्र अधिकारी बी. एच. कोळगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाज्ञठी वन परिमंडळ अधिकारी एम ए खोबरे, वन रक्षक मुंढे, गांधले,घोरपडे,दांडगे यांनी मोलाची कामगिरी केली.      
 
Top