उस्मानाबाद :- जिल्हा परिषद  बांधकाम विभागाची विविध कामांच्या निविदेबाबत आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबादतर्फे ता. परंडा येथील भांडारगृह इमारत दुरुस्ती, भूम येथील  जिल्हा परिष्द प्रशाला दुरुस्ती, उमरगा येथील महिला बाल कल्याण इमारत दरुस्ती, आणि तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीची दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडील योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत ठेकेदार/ कंत्राटदारांकडून वर्ग 9 कडुन  निवीदा मागविण्यात येत आहे. कोऱ्या निवीदेचा नमुना कार्यकारी अभियंता (बांधकाम) जिल्हा परिषद, उस्मानाबादकडून 29 जानेवारी ते दि. 6 फेब्रुवारी पर्यत कार्यालयीन वेळेत (रविवार व सुटीचा दिवस वगळून) देण्यात मिळतील. निवीदा 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत स्वीकारुन नियमानुसार विहीत कालावधीत उघडण्यात येतील.
    संबंधित वर्ग 9 च्या ठेकेदार /कंत्राटदारांनी याची नोंद घेवून आपल्या निवीदा वेळेत पाठवावेत,असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top