नळदुर्ग -: हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जयंतीनिमित्‍त नळदुर्ग येथे विविध कार्यक्रम घेण्‍यात आले.  नगरपरिषद येथे बाळासाहेब ठाकरे यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. यावेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक सुरवसे, सादुल्‍हा काझी, दिपक कांबळे यांच्‍या हस्‍ते पूजन करण्‍यात आले. 
          तसेच राष्‍ट्रीय महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे नगर फलकाचे पूजन करण्‍यात आले. नळदुर्ग येथील मुकबधीर अपंग शाळेत शालेय साहित्‍य व खाऊ वाटप करण्‍यात आले. यावेळी शिवसेनेचे नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके, गजानन कुलकर्णी, खय्युम कुरेशी, प्रविण चव्‍हाण, रुपेश माने, सुनिल गव्‍हाणे, बलदेव ठाकूर, रविंद्र मोरेकर, संदीप हजारे, सनी भूमकर यांच्‍यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top