उस्मानाबाद :- आधुनिक युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाच्या प्रगतीने जग पुढे जात आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्व लक्षात घेवून राज्यस्तरावर नवनवीन प्रयोग सादर करुन आपल्या जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांनी केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान मंडळाच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीपतराव भोसले हायस्कुलात उस्मानाबाद जिल्हा विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य व लोकसंख्या शिक्षण साहित्य प्रदर्शनाचे उदघाटनप्रसंगी डॉ. व्हट्टे बोलताना केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, महिला व बालकल्याण सभापती सविता कोरे, जि.प. सदस्या सुशीला कठारे, पंचायत समिती सदस्य सुरेखा काशीद, आदर्श शिक्षण मंडळाचे सरचिटणीस के. टी. पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.डी. कुंभार, भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस पडवळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके, प्राथमिक शिक्षणाधिकारी ए. एस. उकिरडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव बालाजी तांबे आदि उपस्थित होते.
डॉ. व्हट्टे म्हणाले की, विज्ञान व तंत्रज्ञानाला आज मुल्याची जोड देणे गरजेचे आहे. विज्ञान मूल्याच्या बाबतीत तटस्थ आहे. विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षणाद्वारे विज्ञानाची मांडणी केली तरच यश मिळेल, असे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात दुधगावकर म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दुरदृष्टी, त्यांच्या प्रयत्नातून देशात आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती साधली आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरुन नवीन प्रयोगाच्या माध्यमातून शास्त्रज्ञ निर्माण होण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी गाव, परिसर, शाळा स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
श्रीमती कोरे यांनी, मुलींनी खुप शिक्षण घ्यावे, अंतराळवीर कल्पना चावला यांचा आदर्श घेवून विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहन केले.
खांडके यांनी प्रमख पाहूण्यांचे शाल,श्रीफळ देवून स्वागत केले. स्वागतपर भाषणात ते म्हणाले की, विज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नाचे उकल होत असल्याचे सांगितले. विज्ञान प्रदर्शनाचे विषय, साहित्याची माहिती दिली. या जिल्हास्तरीय प्रदर्शनात शैक्षणिक साहित्याचे 67 प्रतीकृती सहभागी झाले असून हे प्रदर्शन दोन दिवस भरणार आहे. या प्रदर्शनातून गुणानुक्रमांनुसार साहित्याची निवड करुन राज्यस्तरीय प्रदर्शनात पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत पडवळ यांनी केले तर आभार प्रदर्शन गट शिक्षणाधिकारी कल्याण सोनवणे यांनी मानले.
प्रारंभी डॉ. व्हट्टे यांच्या अणुशास्त्रज्ञ होमीभाभा, नेताजी सुभाषचंद्रबोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व दीपपप्रज्वलन करुन प्रदर्शनाचे उदघाटन केले. संगीत शिक्षक महेश पाटील व त्यांच्या विद्यार्थी समुहांनी प्रमुख पाहूण्यांचे स्वागत व देशभक्तीपर गीत सादर केले.
या प्रदर्शनाचा विषय वैज्ञानिक व गणितीय नवोपक्रम अंतर्गत कृषी, उर्जा, आरोग्य, पर्यावरण व संसाधन आहे. विद्यार्थी प्राथमिक गट व माध्यमिक गटाने व शैक्षणिक शिक्षक साहित्यअंतर्गत प्राथमिक / माध्यमिक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक, लोकसंख्या शिक्षणासंबंधी प्रयोगाची मांडणी केली आहे.
या प्रदर्शनास मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, वैज्ञानिक रसीक, मोठया संख्येनेउपस्थित होते. प्रदर्शन यशस्वीतेसाठी विविध समित्या परिश्रम घेत आहेत. विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.