२५ जानेवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त मतदारांना मतदानाचे महत्व समजले पाहिजे. मतदार नोंदणी व मतदानाबाबत प्रभावीपणे जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबाबतची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने नियोजनबध्द मतदारांचे प्रबोधन करून सहभाग (SVEEP) Systematic Voter Education and Electors Participation 2001-02 हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० नुसार पात्र असलेल्या प्रत्येक भारतीयांची मतदार नोंदणी व्हावी आणि मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेचे महत्व साध्य व्हावे हा या मागचा उद्देश आहे.
सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी सन २०१३-१४ ते सन २०१-१८ या पाच वर्षामध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या कार्यक्रमातंर्गत मतदारामध्ये प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी सोलापूर जिल्हयात जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी याबाबतच्या नियोजनाच्या बैठका घेऊन विविध शासकीय विभाग, स्वंयसेवी संस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
या महत्वकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणीमध्ये प्रामुख्याने १८ वर्षावरील एकूण लोकसंख्येएवढी मतदारांची संख्या असावी, यासाठी युवकांची मतदार नोंदणी १०० टक्के करणे तसेच लोकसंख्येमधील महिलांचे प्रमाण आणि मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे, दुर्लक्षित पारधी व अन्य घटक, विडी कामगारांची १०० टक्के नोंदणी करण्याचे नियोजन केले जात आहे.
सर्व कर्मचा-यांची नोंदणी करणे, आणि या विशेष उपाययोजना करण्याचा उद्देश आहे. तसेच मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी मागील निवडणूकीतील झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ करणे, निवडणूक प्रक्रियतील सहभागी कार्यक्रमाचे मतदान १०० टक्के करणे, सैनिक मतदारांचे मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जिल्हयामध्ये रॅली, परिसंवाद मेळावे, पथनाटय आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विभागाच्या वतीने या अनुषंगाने निंबध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. जनजागृती उपक्रमामध्ये एन.सी.सी. व एन.एस.एस. चे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे मंडळ, क्रीडा मंडळ, रोटरी क्लब, आर्ट ऑफ लिव्हिंग आदिंचा सहभाग घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथही तयार करण्यात येणार आहे.
याशिवाय महिला बचत गटांमार्फत सरस्यांची मतदान नोंदणी करणे, बचत गटामार्फत गावांतील १०० टक्के महिलांची नोंदणीसाठी व महिलांना मतदानांसाठी प्रवृत्त केले जाणार आहे. तर अंगणवाडी सेविकामार्फत प्रथम प्रसूती महिला तसेच नवविवाहीत महिलांची १०० टक्के नोंदणी करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे, ग्रामसेवकामार्फत संगणकावर (Help Centre) मदत केंद्र उभारणे, विद्यापीठांच्या मार्फत विद्यार्थ्यांची नोंदणी करणे, मतदारांचे नाव शोधणे करिता मदत केंद्र (Help Centre) उपलब्ध केले जाणार आहे.
तसेच सहकार विभागामार्फत सर्व सहकारी संस्थांच्या मतदारांची एमआयडीसी विभागामार्फत सर्व प्रकल्पांतील कामगारांची १०० टक्के नोंदणी करून मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सोलापूर जिल्हयात प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे उपक्रम राबविणे जाणार आहेत.

- गोंविद अहंकारी
जिल्हा माहिती अधिकारी,
सोलापूर