उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे विना अपघात सेवा केलेल्या चालकांचे तसेच प्रवाशी वाढवा विशेष अभियान योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 7 चालकांचा प्रत्येकी सात चालक  व एक वाहकास रुपये 5 हजार रुपये पारितोषीक देवून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीपराव सोपल आणि खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. पुष्पक मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे शुक्रवार,  दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 10-30 वाजता हा कार्यक्रम होईल.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे हे राहतील. यावेळी खासदार रजनीताई पाटील, डॉ. जनार्दन वाघमारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे,  तर आमदार सर्वश्री ओमराजे निंबाळकर, राणा जगजितसिंह पाटील, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहूल मोटे, ज्ञानराज चौगुले, विक्रम काळे, बसवराज पाटील, दिलीपराव देशमुख, सतिष चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, पेालीस अधीक्षक सचिन पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार आदि उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक अ. ना. गोहत्रे, विभाग नियंत्रणक नवनीत भानप यांनी केले आहे.
 
Top