उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ-यावर येत  असून  त्यांचा दौ-याचा  कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
        शुक्रवार, दि. 31 जानेवारी, 2014  रोजी सकाळी 10-10 वाजता सोलापूरहून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स. 10-20 वा. उस्मानाबादहून ईटकुर, (ता.कळंबकडे) प्रयाण. स. 11 वा. प्राथमिक आरोग्य केंद्र भूमीपूजन व पशुवैद्यकिय दवाखाना लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.  (स्थळ- ईटकुर), दु. 3 वा. ईटकुरहून उस्मानाबादकडे प्रयाण. दु.3-45 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.  सोईनुसार अणदूरहून (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. आगमन, राखीव व मुक्काम.
      शनिवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9-30 वा. अणदूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद  येथे आगमन व राखीव.      स.11 वा. अन्न सुरक्षा कायदा-2014 योजनेचा शुभारंभ. (स्थळ-वाघोली, ता.उस्‍मानाबाद),दु.1 वा. वाघोलीहून तुळजापूरकडे प्रयाण. दु.1-30 वा.  शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु. 2 वाजता अन्न सुरक्षा कायदा-2014 योजनेचा शुभारंभ. (स्थळ- काक्रंबा, ता.तुळजापूर), सायं. 4-30 वा. काक्रंबा येथून तुळजापूरकडे प्रयाण. सायं.5 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. सायं. 7 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.
        रविवार, दि. 2 फेब्रु रोजी सायं. 7 वाजता सोलापूरहून अणदूरकडे प्रयाण.सायं.8 वा अणदूर येथे आगमन व मुक्काम.
        सोमवार, 3 फेब्रु. रोजी  स. 9 वा. अणदूरहून मोहा, (ता.कळंबकडे) प्रयाण.  स. 10-50 वा. मोहा येथे आगमन व राखीव. स. 11 वा. ज्ञानप्रसारक मंडळ, येरमाळा संचलित ज्ञान प्रसारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ-मोहा, ता. कळंब), स. 11-30 वा. शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर ॲग्रेा इंडस्ट्रीज लि. मोहा येथील गुळ पावडर व कृषी उद्योग निर्मिती कारखान्याचा भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ-मोहा), ता. कळंब, दु. 1-30 वा. मोहाहून औरंगाबादकडे प्रयाण.   
 
Top