उस्मानाबाद :- महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व महाराष्ट्र उद्योजकता  विकास केंद्र आयोजित उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत  दि. 12 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत वय 18 ते 35 वयोगटातील 12 वी पास /कृषि पदविका असलेल्या युवक-युवतींसाठी पशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
   या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योजकता स्वत:मध्ये कशी रुजवावी, लघु उद्योग ते उत्पादन उद्योगाची माहिती, परवाना, कच्चा माल,अन्न व भेसळ, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग, फुड टेक्नोलॉजी, फलोत्पादन, औषधी वनस्पती, हरीतगृह, शेडनेट हाऊस ग्रीन हाऊस उभारणी, कर्ज प्रस्ताव, मार्केटींग, कृषी आधारावर प्रकल्प,कृषि उद्योगाचे व्यवस्थापन, कृषि उत्पादन,  खरेदी विक्रीचे तंत्र, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, जाहिरात व विक्री कला, यशस्वी उद्योजकांचे अनुभव, संबंधित उद्योग प्रकल्पांना भेटी, उद्योग निवडीचे तंत्र, बाजारपेठ सर्वेक्षण व विश्लेषण, सुक्ष्म, मध्यम लघुउद्योग सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, एस.एस.आय. रजिस्ट्रेशन, एम.आय.डी.सी. भूखंड, आय.एस.आय. ट्रेडमार्क संबंधी माहिती, लोगो परवाना, उद्योगाला लागणारे परवाने,अन्नधान्य प्रक्रीया उद्योग, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी, वनस्पती, कुलस्टोरेज, वेअर हाऊस उभारणी संबंधी माहिती, जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यासंबंधी अधिक माहिती व प्रवेश अर्जाकरिता सुरवसे सुमितकुमार यांचेशी मो.नं. 9921771935 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पांडुरंग कांबळे, क.प्रकल्प अधिकारी, एमसीईडी व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारतीसमोर, उस्मानाबाद यांनी केले आहे.               
 
Top