उस्मानाबाद -: अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-2014 चा शुभारंभ  वाघोली (ता. उस्‍मानाबाद) येथे शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10-15 वाजता आणि दुपारी 1 वाजता काक्रंबा (ता. तुळजापूर) येथे  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या  हस्ते होणार आहे.
           यावेळी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार सर्वश्री ओमराजे निंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहूल मोटे, ज्ञानराज चौगुले, विक्रम काळे, बसवराज पाटील, दिलीपराव देशमुख, सतिष चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास आदि उपस्थित राहणार आहेत. 
    या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी व जिल्हा पुरवठा अधिकारी आर. पी. मिराशे यांनी केले आहे.
 
Top