उस्मानाबाद -: जिल्हा परिषद, उस्मानाबाद अतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, ईटकूर येथील नवीन इमारत बांधकाम भूमिपूजन व पशवैद्यकीय दवाखाना  श्रेणी -2,च्या नवीन इमारतीचा उद्घाटन लोकार्पण सोहळा आज शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
     यावेळी आमदार बसवराज पाटील, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, समाजकल्याण सभापती दगडू धावारे, महिला व बालकल्याण सभापती  सविता कोरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंडीत जोकार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  एस.एल.हरिदास, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी अडसूळ, न.प.कळंबचे नगराध्यक्ष शिवाजी कापसे, कळंब पं.स.सभापती सौ. छायाताई वाघमारे, उपसभापती लक्ष्मण आडसूळ, मधुकर तावडे, भाऊसाहेब उंबरे, धनंजय रणदिवे, सरपंच चांदणीताई मोरे, उपसरपंच महादेव आडसूळ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.हाश्मी आदि उपस्थित होते.
     ईटकूर येथे जिल्हा वार्षीक योजनेतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत बांधकाम करणे, बाहय पाणी पुरवठा, झेंडा कट्टा, पाणी पुर्नभरण, इमारत पाडणे, सादिल खर्च  यासाठी अंदाजपत्रकीय किंमत 99.75 लक्ष लागणार आहे. तर पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत व संरक्षण भिंत बांधकाम व विद्युतीकरणासाठी 29 लाख 41 हजार 237 रुपये खर्च झाले आहेत.
      यावेळी अनंत आडसूळ, रविंद्र केसकर आदि पत्रकार व ईटकूर गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.   
 
Top