परंडा :- अंदोरा (ता. कळंब) येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेत 26 जानेवारी रोजी दरोडा टाकून साडेअकरा लाख रुपयांची लूट केली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व परंडा पोलिसांनी एका अट्टल दरोडेखोरास सोमवारी मध्यरात्री अटक केली आहे.
    अंदोरा (ता. कळंब) येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरोडा टाकून साडेअकरा लाख रुपये दरोडेखोराने लंपास केले. याप्रकरणी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक माधव गुंडिले, परंडा येथील साहाय्यक पोलिस निरीक्षक गुरुनाथ चव्हाण, गणेश वाघमोडे, महादेव राऊत, सुभाष तांबरे यांनी संयुक्त कारवाई करून सागर माणिक पौळ याला जेऊर (ता. करमाळा) येथून अटक केली. सागर पौळ हा बँक फोडीतील अट्टल गुन्हेगार असून, यापूर्वी अंबी पोलिस ठाण्यांतर्गत झालेल्या गुन्ह्यात तो फरार झाला होता. परंडा पोलिसांनी पौळ याला स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविले आहे.
 
Top