पांगरी (गणेश गोडसे) :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे पन्नास हजार रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना पुणे-लातुर राज्यमार्गावर गुरुवार दि. 23 जानेवारी रोजी दुपारी जामगांव गावाजवळील रिलायन्स पॉईंटसमोर घडली. सुदैवाने दोन्ही वाहनांमधील कोणीही जखमी झाले नाही.
दत्त्तु गणपतराव फोलमंटे यांनी याबाबत पांगरी पोलिसात घटनेची खबर दिली आहे. फोलमंटे यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, ते त्यांच्या ताब्यातील एम.एच.20.ए.2572 ही अहमदपुर-पुणे बस प्रवाशी घेऊन पुण्याकडे जात असताना समोरून बिडकडे निघालेल्या एम.एच23 डब्लु 1870 या टेम्पोची समोरासमोर जोराची धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पांगरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.