सोलापूर :- जिल्हाधिकारी यांना अभ्यागतांनी विविध शासकीय कामकाजास्तव, तक्रारीस्तव अगर निवेदनास्तव भेटण्यासाठी प्रत्येक सोमवारी सायं. 4 ते 6 ही वेळ निर्धारीत केली आहे. परंतु सोमवार दि. 27 जानेवारी 2014 रोजी सकाळी 11 वाजता हरित लवाद न्यायालय, पुणे यांच्याकडे सुनावणीसाठी व दुपारी 1 वाजता उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, पुणे येथे आयोजित केलेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2014-15 चा आराखडा अंतिम करण्यासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य असल्यामूळे दि. 27 जानेवारी 2014 रोजी जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्षरित्या अभ्यागतांना भेटणे अगर त्यांच्या तक्रारी ऐकूण घेणे शक्य होणार नाही. अभ्यागतांच्या तक्रारी, निवेदन अगर इतर अडचणी असतील तर त्या दिवशी त्यांनी अपर जिल्हाधिकारी, सोलापूर (0217-2731001) अगर निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर (0217-2731002) यांना भेटावे असे जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.