पांगरी (गणेश गोडसे) :- कारी (ता. बार्शी) येथील राजु यासीन अतार यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे यांच्या सोलापुर जिल्हा प्रतिनिधीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाच्या सोलापुर जिल्हा प्रतिनिधीच्या निवडणुकीत राजु अतार यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी मनोहर लिंबाजी होळकर यांनी आतार यांची बिनविरोध निवड घोषित केली व निवडीचे पत्र सुपुर्द केले. आतार यांची कर्मचारी संघावर पाच वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या वडीबदल कारीचे सरपंच इम्रान मुलानी, उपसरपंच अतुल चालखोर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता देसाई, कामराज बनसोडे, नागसेन कदम, कचरू कदम अरविंद अटपळकर, गणपत वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांमधुन त्यांचे अभिनंदन होत आहे.