मकरंद निंबाळकर |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : वैराग ता.बार्शी येथील डॉ.हेमंत बळवंत साळवे यांच्यावर तलवारीने झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायाधिश व्ही.बी.मुल्ला यांच्या कोर्टात शुक्रवारी दि.२४ रोजी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. यातील मुख्य आरोपी व सध्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मकरंद वसंतराव निंबाळकर यास १ वर्ष साधी कैद ५ हजारांचा दंड, इतर दोन आरोपींना प्रत्येकी ३ महिने साधी कैद व १ हजारांचा दंड देण्याच्या निर्णयाची सुनावणी झाली.
सदरची घटना वैराग येथील कसबा गल्ली येथे ३१ मार्च २०० साली रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यातील फिर्यादी व जखमी असलेल्या डॉ.हेमंत साळवे हे आपल्या दवाखान्यातून घराकडे गेले व परत घरातून दवाखान्यात येत असतांना यातील आरोपी मकरंद निंबाळकर यांनी डॉक्टर यांचा नोकर आहिरे याच्या अंगावर मोटर सायकल का घातली असे म्हणून मारहाण केली यामध्ये तलवारीने हल्ला करुन डॉक्टरांच्या डाव्या पायाच्या लवणीवर जखम केल्याची तक्रार नोंदविण्यात आली. याप्रकरणी सन २००० मध्ये बार्शी न्यायालयात मकरंद निंबाळकर, वसंतराव निंबाळकर, मयत चंद्रकांत उर्फ नाना निंबाळकर , गोरख आहिरे यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते.