सोलापूर :-  जिल्ह्याची लीड बँक बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत चालविण्यात येणारी स्टार स्वरोजगार संस्थेची आढावा बैठक बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर एम.के.श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
    या बैठकीत प्रशिक्षण अधिकारी वाय. यु. जिकरे यांनी सन 2013 मध्ये स्टार स्वरोजगार संस्थेद्वारे 488 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली. यामध्ये 308 दारिद्रयरेषखालील प्रशिक्षणार्थींचा समावेश असून पुढील महिन्यात माळशिरस, कुर्डुवाडी आणि बार्शी येथे प्रशिक्षण आयोजित करणार असल्याचा उल्लेख केला.
    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून 31 मार्च पर्यंतच्या दाखल प्रकरणांची सर्व रक्कम मिळाली असून सन 2013-14 मधील दाखल प्रकरणांची रक्कम त्वरित मिळविण्याविषयी श्री. श्रीवास्तव यांनी सुचीत केले.
संस्थेच्या मालकीच्या इमारतीचे काम लवकरच करण्यात येणार असून यामध्ये कॉम्प्युटर लॅब, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था इ. सह इतर अनेक सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री. जिकरे यांनी सांगितले. बैठकीमध्ये सन 2014-15 करीता लागणा-या संस्थेच्या खर्चाचे अंदाजपत्रकही सादर करण्यात आले.
   बैठकीस नाबार्डचे विजय काळे, अग्रणी बँकेचे माधव कोरवार, आयटीआय मंद्रुपचे प्राचार्य आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
Top