कळंब (भिकाजी जाधव) :- कळंब येथे अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायालय सुरु व्‍हावेत, या मागणीसाठी शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता कळंब तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सर्व पक्षीय कळंब तालुका विकास नागरीक कृती समितीच्‍यावतीने करण्‍यात येणार आहे.
        कळंब येथे अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायालय आणि दिवाणी न्‍यायालय वरिष्‍ठ स्‍तर हे न्‍यायालये सुरु व्‍हावेत, यासाठी नागरीक, वकील संघाकडून गेली पंचवीस वर्षे पाठपुरावा केला जात आहे. परंतु याची दखल घेतली जात नाही. कळंब न्‍यायालयात दाखल प्रकरणे, पॅक्‍टीस करणा-या वकीलांची संख्‍या, निर्णयानंतर अपिलासाठी जिल्‍हा व सत्र न्‍यायालयातील प्रकरणे, या सर्व गोष्‍टींचा विचार व्‍हावा, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
      सदरील न्‍यायालय कळंब येथे सुरु व्‍हावे, या मागणी साठीच्‍या उपोषण आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन सर्वपक्षीय कळंब तालुका विकास नागरीक कृती समितीच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
 
Top