बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कमी दाबातील विजेचा पुरवठा आणि खंडीत विज पुरवठा यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या विभागीय कार्यालयात घेराव घालण्यात आला.
    यावेळी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड, तालुका कार्यध्यक्ष हनुमंत भोसले, नांदणीचे वनराज यादव यांच्यासह तालुक्यातील सुमारे शंभर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता एस.पी. वडगणे, तालुका सहाय्यक अभियंता एस.एस. कोंडगुळे यांना लेखी निवेदन देण्‍यात आले. कार्यकर्त्‍यांनी दोन तास घेराव घातल्‍यानंतर अधिका-यांनी चार ते पास दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्‍याचे लेखी आश्‍वासन दिले.
 
Top